17/12/2024

जेऊर : संभाजी ब्रिगेडच्यावतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

0
IMG-20240106-WA0036.jpg

जेऊर, दि. 6 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी बोलताना पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके म्हणाले की, भारतीयांच्या विद्येची खरी देवता सावित्रीबाई फुले या आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगावं येथे नेवासे पाटलांच्या कुटुंबात झाला. सनात त्यांनी सनातन्यांनी शेण फेकून मारलं पण तू चंदन म्हणून स्वीकारलं त्यांनी बहिष्कार केला पण तो कधी तिरस्कार केला नाहीस दिंड काढली पण तू कधी पिंड बदलू दिला नाहीस प्रेत यात्रा काढली पण तू तुझी शिक्षणाची रथयात्रा कधी थांबवली नाहीस दगड गोटे मारले पण तू नेहमीच त्या बदल्यात वैचारिक फुले दिलीस तुझा लढा आमच्यासाठीचा काल इतिहास सांगून गेला आज वर्तमान नात तुझ्या लेकी माय भविष्य घडवत आहेत तुझ्या आजन्म ऋणी तुझ्या लेकी आज तुझ्या मार्गावर चालत आहेत.

विद्येची देवता म्हणून आपण सरस्वतीचे पूजन करतो, परंतु सरस्वतीने आपल्या देशात बालवाडी, शाळा, महाविद्यालय सुरू केले का?. कोणाला अध्यापन केल्याची नोंद आहे का?. तसा कोणताही पुरातत्त्वीय किंवा ऐतिहासिक पुरावा नाही. सनातनी परंपरेने स्त्री शिक्षणावरती बंदी घातली होती, त्यामुळे ब्राह्मण स्त्रियांना देखील शिक्षणाचा अधिकार नव्हता सरस्वती एक महिला म्हणून तिच्याबद्दल नितांत आदर आहे, परंतु सार्वजनिक आणि मोफत शिक्षणाचा पाया आपल्या देशात प्रथमतः फुले दांपत्याने घातला. सावित्रीबाई फुले या भारतातील आद्य स्त्री शिक्षिका आहेत. त्यांनी सर्व जातीधर्मातील मुलामुलींना मोफत शिक्षण दिले. त्यांनी ब्राह्मण मुलींना देखील आनंदाने शिकवले. सावित्रीबाई फुले यांच्या काळात जर सरस्वती जन्माला आली असती तर सावित्रीबाईंनी सरस्वतीलासुद्धा शिकविले असते, इतक्या मोठ्या मनाच्या सावित्रीबाई होत्या.

यावेळी उपस्थित पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके, निलेश पाटील, धन्यकुमार गारुडे, अतुल निर्मळ, हेमंत शिंदे, आदिनाथ माने, पिंटू जाधव, सागर बनकर, किशोर कदम, अविनाश घाडगे, दीपक सुरवसे, लालासाहेब लोंढे, शुभम म्हमाणे, सचिन गारुडे, बाळासाहेब तोरमल, अभिजीत म्हमाणे, सागर लोंढे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page