जेऊर रेल्वे गेट बंदला आज बारा वर्षे पूर्ण; माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या प्रयत्नातून मिळाला पर्यायी भुयारी मार्ग


जेऊर, दि. 17 (करमाळा-LIVE)-
17 जानेवारी 2012 रोजी जेऊरचे रेल्वे गेट इतिहास जमा झाले होते, जेऊर रेल्वे गेट बंदला आज बारा वर्षे झाली असली तरी पर्यायी मार्ग म्हणून भुयारी मार्ग झाला असल्यामुळे जेऊरचा विकास कायम असून जेऊर भुयारी होण्यासाठी माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी निधी मंजूर करून आणला होता.
जेऊरमध्ये येथे मध्य रेल्वेचे रेल्वे गेट होते. परंतु दुहेरीकरण आणि रेल्वे गेट मुक्त करण्यासाठी रेल्वे विभागाने गेल्या दहा वर्षांपूर्वी गेट बंद केले. परिणामी जेऊर गावाचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग पडले, पर्यायी मार्ग म्हणून जेऊरला उड्डाणपूल बांधण्यात आला परंतु हा पूल गावापासून तीन किमी असल्याने नागरिकांचे हाल होत होते. पूर्वेकडे शाळा, दवाखाने, बाजारपेठ असल्याने पश्चिमेकडील नागरिकांना गावात येण्यासाठी तीन किमी चा प्रवास करावा लागत होता.

परंतु जेऊरवासीयांच्या संघर्षाला तत्कालीन शिवसेनेचे आमदार नारायण आबा पाटील यांनी न्याय मिळवून दिला, आणि व्यव अग्रक्रम समिती मधून जेऊर भुयारी मार्गासाठी आठ कोटी रुपये तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुंगुंटीवार यांनी मंजूर केले, त्यामुळे जेऊर रेल्वे गेट मध्ये भुयारी मार्ग सुरू झाला.
भुयारी मार्गामुळे जेऊर परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.




- भारत प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील व भेटकार्ड
- सोलापूर सामाजिक वनीकरण विभागाकडुन आयोजित स्पर्धेत जेऊरच्या भारत हायस्कूलची आरूषी बादल प्रथम तर शिवानी कुंभार तृतीय
- स्वतःचा कारखाना विकणाऱ्या माजी आमदार शिंदे आणि त्यांच्या गटाने आदिनाथची काळजी करू नये- पाटील गट
- जेऊर येथील ओंकार पोळ याचे प्रथम पुण्यस्मरण ; केम व शेटफळ येथे विद्यार्थ्यांना भोजन व शालेय साहित्यांचे वाटप
- कोर्टीच्या सरपंच भाग्यश्री नाळे-मेहेर यांना ग्रामररत्न सरपंच पुरस्कार जाहीर