17/12/2024

जेऊरच्या युरो किड्स मध्ये क्रीडा दिन साजरा

0
IMG-20240117-WA0034.jpg

जेऊर, दि. 17 (करमाळा-LIVE)-
नूतन करमाळा तालुका हँडबॉल असोसिएशन संचलित युरो किड्स येथे क्रीडा दिन साजरा करण्यात आला.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्या समीरा दोशी उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी उपस्थित सर्व खेळाडू व पालक यांना मार्गदर्शन केले. मोबाईल पासून आपल्या मुलांना दूर ठेऊन मैदानी खेळाकडे लक्ष देण्याची गरज आहे व जास्तीत जास्त खेळाडूने भाग घेतला पाहिजे हे आवर्जून सांगितले.

यावेळी नूतन करमाळा तालुका हँडबॉल असोसिएशनचे सचिव विनोद गरड, सहसचिव दत्तात्रय वाघमोडे यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page