डिजिटल मीडियाला संघटनेच्या माध्यमातून प्रिंटमिडियाप्रमाणे राज मान्यता मिळवून देणार – जेष्ठ पत्रकार राजा माने
करमाळा, दि. 22 (करमाळा-LIVE)-
वृत्तपत्र पत्रकारिता व डिजिटल पत्रकारिता एकाच नाण्याच्या दोन बाजु असून हे दोन्ही माध्यमं समाज घडविण्याचे काम करतात सध्याच्या काळामध्ये आपली मूल्ये जपत कर्तव्य भावनेतून काम करणे गरजेचे असुन आपण संघटनेतच्या माध्यमातून डिजिटल मीडियाला प्रिंटमिडियाप्रमाणे राजमान्यता मिळवून देणार असल्याचे मत डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी व्यक्त केले.
काल रविवारी २१ जानेवारी रोजी करमाळा येथे शासकीय विश्रामगृह येथे डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटना करमाळा यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. सध्या डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या मोठी आहे. त्यांना या क्षेत्रातील संधी येणाऱ्या अडचणी आणि आव्हाने याबाबत या बैठकीत चर्चा झाली. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे दुसरे महा अधिवेशन कन्हेरी मठ कोल्हापूर येथे होणार आहे त्याचा आढावा देखील या बैठकीत घेण्यात आला.
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बैठक संप्पन झाली. या बैठकीला डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे तालुकाध्यक्ष दिनेश मडके, उपाध्यक्ष शितलकुमार मोटे, प्रसिध्दीप्रमुख अंगद भांडवलकर, संपर्कप्रमुख अशोक मुरूमकर, विशाल घोलप, सागर गायकवाड, हर्षवर्धन गाडे, संजय कुलकर्णी, विजयराव पवार, यश चौकटे आदी उपस्थित होते.
सुरुवातीला डिजीटल मिडिया संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांचा मानाचा फेटा, हार, शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली ज्यामधून उपस्थित सर्व पत्रकारांना पत्रकारिता क्षेत्रातील स्थित्यंतरे, संधी आणि आव्हाने याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे दुसरे महा अधिवेशन कणेरी मठ कोल्हापूर येथे दिनांक 29 जानेवारी रोजी होत असून या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच पत्रकारिता क्षेत्रातील अनेक बाबींवर चर्चासत्र परिसंवाद असे अनेक उपक्रम या अधिवेशनात होणार आहेत त्यामुळे सर्व पत्रकारांनी या अधिवेशनाला उपस्थित रहावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक दिनेश मडके यांनी केले तर सर्व उपस्थिताचे उपाध्यक्ष शितलकुमार मोटे यांनी आभार मानले.