हिंगणीत अयोध्येचे स्वरूप; अयोध्येतील मूर्ती प्रतिष्ठापणा निमित्ताने हिंगणी येथे विविध कार्यक्रम संपन्न
करमाळा, दि. २३ (करमाळा-LIVE)-
अयोध्येतील राम मंदीर व राम मूर्ती प्रतिष्ठापणा निमित्ताने हिंगणी येथे प्रभू रामचंद्र व राम भक्त हनुमान यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
अयोध्येतील राम मंदीर लोकार्पण सोहळा व राम लल्ला च्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा काल दि. २२ जानेवारी रोजी भव्य दिव्य प्रमाणात साजरा होत असताना सकाळ पासूनच हिंगणी गावात सडा समार्जन, रांगोळी याने सजले गेले.
यावेळी लहान तसेच थोरांनी भक्ती-भावाने तन मन धनाने श्रीरामांची सेवा केली. मिरवणूकीत गावातील सर्व ग्रामस्थ तरुण वर्ग व भजनी मंडळ व महिला मंडळींनी ही उपस्थिती दाखवली.
या श्रीराम मिरवणूकीसाठी रवींद्र बाबर, प्रविण बाबर, योगेश बाबर, अक्षय तुपे, शिवाजी बाबर, आकाश बाबर, अमोल पाटील, संकेत पाटील यांनी परिश्रम घेतले. तर भक्तीमय वातावरणात भव्यदिव्य असा मिरवणूक सोहळा पार पडला.