हिंगणी येथे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा
करमाळा, दि. २५ (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील हिंगणी येथे श्री भैरवनाथ प्रतिष्ठान व श्री भैरवनाथ प्रतिष्ठान शेतकरी बचत गट आणि सरपंच हनुमंत पाटील मित्र मंडळ यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी शिव प्रतिमेचे पूजन करून सायंकाळी 8 ते 10 या वेळेत बालकीर्तनकार ह.भ.प. सोहम महाराज सातपुते (बीड) यांची कीर्तन सेवा झाली. या कीर्तन सेवेत गावातील सर्व शिवप्रेमी ग्रामस्थ, भजनी मंडळ व महिला मंडळ यांनी उपस्थित राहून कीर्तन सेवेचा लाभ घेतला. व गावातील सर्वच ग्रामस्थ व महिला मंडळ यांनी आयोजकांचे व महाराज यांचे कौतुक केले. महाराजांचे वय अवघे 13 वर्षे होते. या वयात यांनी खूप भारी प्रकारे कीर्तन सेवा पार पाडली.
या कार्यक्रमासाठी गावातील सर्व शिवप्रेमींनी तन, मन, धनाने देणगीच्या स्वरूपात जी काही मदत केली त्या बद्दल भैरवनाथ प्रतिष्ठान व भैरवनाथ प्रतिष्ठान शेतकरी बचत गट आणि सरपंच हनुमंत पाटील मित्र मंडळ यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.