उच्च ध्येय्य गाठण्यासाठी शालेय संस्कार दिशादर्शक ; प्रा. गणेश करे-पाटील


करमाळा, दि. २९ (करमाळा-LIVE)-
उच्च ध्येय्य गाठण्यासाठी शालेय संस्कार दिशादर्शक असल्याचे मत यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील यांनी व्यक्त केले.
कुंभेज येथील कै दिगंबरराव बागल विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारोह पार पडला त्यावेळी श्री करे-पाटील बोलत होते. यावेळी यशकल्याणी संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा उपक्रमासाठी बागल विद्यालयास केले एकवीस हजार रूपयांचे आर्थिक मदत देण्यात आली,
दरम्यान या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक हनुमंत पाटील होते. आपल्या मार्गदर्शन सत्रामध्ये प्रा.करे पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय्य गाठण्यासाठी शालेय संस्कार महत्वाचे असून माध्यमिक शिक्षणाच्या काळात जीवनाची दिशा ठरवली जाते यासाठी शाळांची भूमिका जबाबदारीची आहे. समाजाला गुणवान संस्कारी विद्यार्थी घडविणाऱ्या शिक्षक व अशा शाळांची गरज आहे.कुंभेजचे बागल विद्यालय या बाबतीत विशेष योगदान देत असून ग्रामस्थ व पालकांच्या विश्वास व सहकार्याच्या जोरावर यशस्वी वाटचाल करत आहे असे गौरवोद्गार काढले.
यावेळी भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी स्मृती गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्रा. करे पाटील यांचा मुख्याध्यापकांचे वतीने सन्मान करण्यात आला. विद्यालयातील विद्यार्थ्यीनी श्वेता पवार, पूजा शिंदे, साक्षी मिसाळ, तृप्ती सातव यांनी मनोगत व्यक्त केले तर मुख्याध्यापक हनुमंत पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांनी करीयर निवडताना आवड, क्षमता व संधी या त्रिसुत्रीचा अवलंब केल्यास येणाऱ्या काळात विद्यार्थी यशस्वी वाटचाल करतील समाजासाठी भरीव योगदान देतील. या कार्यक्रमात मार्च 2023 मधील विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी यशकल्याणी संस्थेतर्फे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे तीन हजार, दोन हजार व एक हजार रूपयांचे रोख पारितोषीक प्रा. करे- पाटील सर व मान्यवरांचे उपस्थितीमध्ये गुनावंत विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आले.
प्रथम क्रमांक अंजली राजेंद्र भोसले, द्वितीय क्रमांक निकीता सहदेव सुरवसे, तर तृतीय क्रमांक संदेश सुधीर साळुंके यांना गोल्ड मेडल, रोख रक्कम व प्रमाणपत्र पालकां समवेत प्रदान करण्यात आले.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात करमाळा तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवल्या बद्दल मुख्याध्यापक व शिक्षक वृंदांचा सन्मान पोलीस पाटील कुंभेज यांचे वतीने अनिल साळुंके यांनी केला. यावेळी व्यासपीठावर माजी सरपंच महादेव शिंदे, उद्योगपती महावीर साळुंके, शिवस्फूर्ती समूहाचे जिल्हा अध्यक्ष, अनिल कादगे, सकाळचे पत्रकार गजेंद्रजी पोळ, प्रगतशील शेतकरी प्रशांत नाईकनवरे, उपसरपंच बिभिषण गव्हाणे, अनिल साळुंके, राजेंद्र भोसले, सहदेव सुरवसे, कुमारशेठ कादगे, पक्षीमित्र कल्याणराव साळुंके, सिताराम बनसोडे, संतोष शिंदे, विष्णू पोळ, दादा जाधव, संतोष घोरपडे, किशोर कदम, बलभीम वाघमारे नंदकिशोर कांबळे, सावतामाळी डेकोरेटरचे समाधान रगडे, हर्षद जाधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिक्षा कन्हेरे व समिक्षा चांदणे यां विद्यार्थ्यीनींनी केले तर भक्ती मुटके हीने उपस्थितांचे आभार मानले.



