17/12/2024

प्रवाशांनो कृपया इकडे लक्ष द्या! एसटी ने प्रवास करायचा असेल तर अंथरून, पांघरूण, तंबू घेऊनच बाहेर पडा, कुठे मुक्काम करावा लागेल सांगता येणार नाही

0
IMG-20231225-WA0018.jpg

करमाळा, दि. ९ (करमाळा-LIVE)-

प्रवाशांनो कृपया इकडे लक्ष द्या! एसटी ने प्रवास करायचा असेल तर अंथरून, पांघरुन, तंबू घेऊनच बाहेर पडा, कुठे मुक्काम करावा लागेल सांगता येणार नाही अशा प्रकारचे मेसेज आता सोशल मिडीयावर येत असून याला कारणीभूत करमाळा आगार आहे.


एसटी महामंडळाच्या करमाळा आगाराच्या बस ला उतरती कळा लागली असून गेल्या तीन महिन्यांपासून कमीतकमी दररोज एक बस बंद पडत असल्यामुळे प्रवासी हैराण झालेले आहेत.

करमाळा आगारात सध्यातरी 65 गाड्या उपलब्ध आहेत. परंतु आगाराला 85 गाड्यांची गरज आहे. उपलब्ध असलेल्या 65 गाड्यांत दररोज दोन-तीन गाड्या नेहमी बंद पडत आहेत.

करमाळा-LIVE ला सोशल मिडीयाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार पुढीलप्रमाणे गाड्या खराब झाल्यामुळे बंद पडल्या आहेत.


दि. ८ मार्च- करमाळा- कर्जत शेगुड येथे, एक कंदर येथे तर एक विहाळ येथे बंद

14 डिसेंबर- करमाळा ते पुणे- यवत येथे बंद पडली (फोटो उपलब्ध नाही)

15 डिसेंबर- पंढरपूर ते करमाळा
21 डिसेंबर- जामखेड ते करमाळा
22 डिसेंबर- गाडी मार्ग उपलब्ध नाही (गाडी वीट येथे बंद)
22 डिसेंबर- पंढरपूर ते करमाळा (देवळाली येथे बंद पडली)
23 डिसेंबर- गाडी मार्ग उपलब्ध नाही (रोशेवाडी येथे बंद)
24 डिसेंबर- गाडी मार्ग उपलब्ध नाही (कामोणे येथे बंद)
24 डिसेंबर ची सोशल मिडीयावरील पोस्ट
24 डिसेंबर ची सोशल मिडीयावरील पोस्ट
25 डिसेंबर- अहमदनगर ते पंढरपूर (जातेगावं येथे बंद)
25 डिसेंबर- करमाळा ते बार्शी (गुरुकुल येथे बंद)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page