17/12/2024

माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या शिवसेना प्रवेशाला आज दहा वर्षे पूर्ण ; आजही शिवसेनेच्या माध्यमातून जनसेवा सुरू

0
IMG-20240314-WA0033.jpg

जेऊर, दि.१५ (करमाळा-LIVE)-
शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या शिवसेना प्रवेशाला आज दहा वर्षे पूर्ण झाली असून आजही शिवसेनेच्या माध्यमातून जनसेवा सुरू असल्याचे मत तालुक्यातील जनता करीत आहे.

राष्ट्रवादीला सोडचिट्टी देत १४ मार्च २०१४ ला माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले आणि सहाच महिन्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणूकीत करमाळ्यात भगवा फडकविला. विशेष म्हणजे 2014 ला सोलापूर जिल्ह्यातून नारायण आबा हे एकमेव शिवसेनेचे आमदार होते.

2019 ला काही कारणांमुळे शिवसेनेची उमेदवारी मिळाली नाही, परंतु त्यांनी ही निवडणूक अपक्ष लढवून तब्बल 72 हजार मते घेतली, हे विचार करण्यासारखे होते. जर शिवसेनेची उमेदवारी मिळाली असती तर आज चित्र वेगळे दिसले असते.

2019 ला बंडखोरी जरी केली असली तरी आजही नारायण पाटील हे शिवसेनेतच आहेत. दरम्यान राज्यात झालेल्या सत्ता संघर्ष आणि दोन शिवसेना वेगवेगळ्या झाल्या आजही नारायण पाटील शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीत नारायण आबा पाटील कोणता निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे आहे. कारण सध्या राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा महायुतीचे सरकार आहे. करमाळ्याचे आमदार संजयमामा हे अजित पवार समर्थक असल्याने महायुतीत हि जागा शिंदे गटास मिळणार की पवार गटाला जाणार हे आता सांगता येत नाही. त्यामुळे श्री पाटील हे आगामी विधानसभा निवडणुकीत काय निर्णय घेतील हे मात्र गुलदस्त्यात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page