05/01/2025

मिशन विधानसभा 2024 : ९ जून पासून पाटील गटाचा जनसंवाद दौरा ; करमाळा मतदारसंघातील वाडी-वस्ती- गावभेट दौऱ्याचे आयोजन

0
IMG_20220801_131001-7.jpg

जेऊर, दि. ३ (करमाळा-LIVE)-
माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांचा करमाळा मतदार संघात “जनसंवाद वाडी-वस्ती गाव भेट दौरा” रविवार ९ जून पासून सुरू होणार आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील गटाकडून आता पासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून गावभेट दौरा हा याचा मुख्य भाग असणार आहे.

तब्बल चाळीस दिवसांच्या या दौऱ्यात माजी आमदार नारायण पाटील हे स्वतः जनतेशी संवाद साधणार आहेत. गावातील बैठकी बरोबरच सदर गावाशी संलग्न वाडी वस्तीवर जाऊन प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या समवेत संवाद साधला जाणार आहे.

गाव आणि वाडी वस्तीवरील नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी हा दौरा आहे. रविवार दिनांक ९ जून रोजी निंभोरे येथून या जनसंवाद वाडी-वस्ती गावभेट दौऱ्यास सुरुवात होत आहे. रविवारी निंभोरे, घोटी, वरकुटे, नेरले, पाथुर्डी व मलवडी या गावांना वाडीवस्तीसह भेटी दिल्या जातील.

दि ९ जून पासून सुरु झालेला हा दौरा १९ जूलै पर्यंत चालू राहणार आहे. एका नियोजन पध्दतीने या दौऱ्याची आखणी केली असून यात करमाळा मतदार संघातील पुरातण इतिहास असलेली तिर्थक्षेत्रांचे ठिकाणी जाऊन आशीर्वाद घेतला जाणार आहे. समाजातील प्रत्येक घटकाशी माजी आमदार नारायण आबा पाटील यांचा संवाद घडवून आणला जाणार आहे. तसेच युवक, वृध्द, महिला, शेतकरी, शेतमजूर, नोकरदार, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते यांच्या गाठीभेटींचाही यात समावेश आहे. प्रत्येक गावातील तसेच वाडी वस्तीवरील समस्यांची नोंद करुन आगामी काळात यावर उपाय योजना करण्याचे नियोजन केले जाईल.

एकंदरीत हा गावभेट दौरा हा करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यासाठी पुरक ठरणार असल्याचे दिसून येत आहे. या दौऱ्याची आखणी पुर्ण झाली असून एन पी मिशन २०२४ यांचे कडून या दौऱ्याची तपशीलवार माहिती प्रसिध्दी माध्यमे तसेच कार्यकत्यांना दिली जाणार आहे. माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या या दौऱ्यात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page