भाळवणीच्या तृप्ती वाघमारे चे नीट (NEET) परीक्षेत घवघवीत यश
जेऊर, दि. ८ (करमाळा-LIVE)-
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) घेण्यात आलेल्या नीट (NEET) परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला.या परीक्षेत करमाळा तालुक्यातील भाळवणी येथील तृप्ती पांडुरंग वाघमारे हीने घवघवीत यश संपादित केले असून पुणे येथील नवले मेडिकल काॕलेज मध्ये एमबीबीएस (MBBS) साठी प्रवेश मिळालेला आहे.
तृप्ती वाघमारे हिने ७२० पैकी ६२९ गुण मिळवत यश संपादन केले आहे. तृप्ती हीचे प्राथमिक शिक्षण आदिनाथ कारखाना येथील विद्यालयात झाले आहे तर माध्यमिक दहावी पर्यंत जेऊर येथील भारत हायस्कूल मध्ये झाले आहे. तर अकरावी- बारावी तिने उक्कडगावं येथील डॉ चंद्रभानू सोनवणे काॕलेज मध्ये केलेले आहे.
तृप्ती चे लहानपणापासूनच मनात डॉक्टर व्हायची जिद्द होती. मेहनत, कष्ट आणि जिद्दीने अभ्यास करून नीट परीक्षेत यश मिळविले आहे.
तृप्ती वाघमारे ही भाळवणीचे माजी सरपंच पांडुरंग उर्फ दादा वाघमारे यांची कन्या असून तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशातील नीट परीक्षा अत्यंत महत्त्वाची समजली जाते. या अभ्यासक्रमासाठी ५ मे रोजी परीक्षा झाली होती. विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्कंठा लागून राहिलेल्या या परीक्षेचा निकाल बुधवारी वेबसाइटवर दुपारी जाहीर झाला. केमिस्ट्री, फिजिक्स आणि बायोलॉजी या तीन विषयांची एकूण ७२० गुणांची परीक्षा होती.