करमाळ्यात नंदन प्रतिष्ठानच्या वतीने योग शिबिर संपन्न
करमाळा, दि. २१ (करमाळा-LIVE)-
जागतिक योग दिनाचे औचित्य साधत
नंदन प्रतिष्ठान आणि पतंजली योग समिती करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने भव्य योगा शिबिर चे आयोजन केले होते.
२१ जून रोजी सकाळी ६:४५ ते ७.४५ या वेळेत हे शिबिर संपन्न झाले.प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस उद्योजक राजू काका शियाळ, संतोष काका कुलकर्णी आणि पत्रकार सचिन जव्हेरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शिबिराची सुरुवात करण्यात आली.
सुरवातीला भाजपा किसान मोर्चाचे नरेंद्रसिंह ठाकुर यांनी योगाविषयी आपले मत मांडले.
एक सुदृढ व निरोगी आयुष्य जगण्याचा सोपा मार्ग योगसाधनेत आहे. अवघ्या जगाने योगाची किमया मान्यही केली आहे व अनुभवली देखील आहे. योग जीवनशैली आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थी आमूलाग्र बदल घडविते असे मत योग शिक्षक बाळासाहेब नरारे सर यांनी मांडले.
योगा, प्राणायाम आणि मेडीटेशन करून योगा शिबिर उत्साहात पार पडले. नागरिकांचे जीवन निरोगी व्हावे हाच उद्देश समोर ठेवून दरवर्षी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा भाजपा करमाळा शहर चे जितेश कटारिया यांच्या नियोजनखली नंदन प्रतिष्ठान आणि पतंजली योग समिती करमाळा यांच्या माध्यमातून योग शिबिर राबवत असतात.यावेळी प्रतिष्ठानचे मार्गदर्शक प्रकाश क्षिरसागर तसेच अक्षय परदेशी, निलेश माने यांच्यासह अनेक सहकारी, मित्र परिवार उपस्थित होता.