आमदार संजयमामा शिंदे आशादायी व विकासप्रिय नेतृत्व- प्रा.गणेश करे-पाटील
करमाळा, दि. १६ (करमाळा-LIVE)-
आमदार संजयमामा हे सर्वार्थाने आशादायी, विकासप्रिय व सर्वसमावेशक नेतृत्व असून असे नेतृत्व करमाळ्याला लाभले हे आपले भाग्य असल्याचे प्रतिपादन यशकल्याणी संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष प्रा.गणेश करे-पाटील यांनी येथे बोलताना केले.
आमदार संजयमामा यांनी करमाळा शहरात विविध योजनांद्वारे मंजूर करवून घेतलेल्या अनेक विकासकामां
पैकी आज आजी-माजी सैनिक कल्याणकारी संस्थेसाठी कारगिल भवन,मदारी समाज स्मशानभूमी व ख्रिश्चन समाजभूमी संरक्षक भिंत बांधणे,पेव्हिंग ब्लॉक्स बसविणे, भुईकोट किल्ला जतन व संवर्धन या कामांचे भूमिपूजन याकामांच्या फलकांचे अनावरण संपन्न झाले.
यावेळी बोलताना प्रा. करे-पाटील यांनी आजी-माजी सैनिकांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात सर्वप्रथम करमाळ्यात हे कारगिल भवन उभारण्यासाठी संजयमामा यांनी कारगिल भवन बांधणीसाठी २० लक्ष आणि संरक्षक भिंत व सुशोभीकरणासाठी ३० लक्ष निधी मंजूर करवून घेतला हे आजी-माजी सैनिक कधीही विसरू शकणार नाहीत.
या सर्व कार्यक्रमांना सैनिक संघटनेचे अध्यक्ष अक्रुर शिंदे, किरण ढेरे, निलंगे काका व त्यांच्या संघटनेचे सर्व सदस्य,सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण माने, विवेक येवले, अॕड. राहुल सावंत, प्रवीण जाधव, फारुख जमादार, अशपाक जमादार, अभिषेक आव्हाड, चंद्रकांत चुंबळकर, डॉ.रेश्मा भाम्बल, एलिझाबेथ आसादे, सागर गायकवाड, प्रियांका गायकवाड, प्रवीण शहाणे, प्रवीण कुटे, प्रफुल्ल शिंदे, भरत अवताडे, तानाजी झोळ, उमर मदारी, बापू तांबे, दिग्विजय घोलप, संजय भालेराव, राजेंद्र बारकुंड, संदीप नवले, प्रकाश माने, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता के.एम.उबाळे, जयकुमार जाधव, किरण फुंदे आदी उपस्थित होते.