19/10/2025

नारायण आबा पाटील यांना मत म्हणजे शरदचंद्र पवार साहेबांना मत आहे असे समजून मतदान करा ; डॉ.अमोल कोल्हे

0
IMG-20241118-WA0042.jpg

करमाळा, दि. १८ (करमाळा-LIVE)-
कुर्डूवाडी येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नारायण आबा पाटील यांच्या २४४ करमाळा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता सभा पार पडली. या प्रचारसभेत डॉ.कोल्हे यांनी नारायण आबा पाटील उमेदवार म्हणजे खुद्द शरदचंद्र पवार उमेदवार आहेत समजून आबांना विजयी करा असे आवाहन केले.

आपल्या भाषणात डॉ.कोल्हे यांनी संजयमामा शिंदे व बबनदादा शिंदे या दोघांवरही सडकून टीका केली. एकीकडे पवार साहेबांचे उंबरे झिजवायचे व दुसरीकडे जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून अपक्ष लढायचे असे अविश्वासू दोन्ही बंधूंना पवार साहेबांच्या आदेशाचे पालन करत पराभूत करा असे आवाहनही केले. कुर्डुवाडी व परिसरातील जनता ठाकरे घराण्यावर व पवार साहेबांवर प्रेम करणारी आहे. ज्यांनी उद्दव ठाकरे साहेबांच्या व पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, संकट काळात आधार द्यायचा सोडून विश्वासघात केला अशा दोन्ही शिंदे बंधूंना पराभूत करून दाखवून द्या की, करमाळा,माधा मतदारसंघातील जनता ही गद्दारांना माफी करत नाही.

आजच्या जाहीर सभेत शिवसेनेचे नेते हुजुर इनामदार यांनीही मुस्लिम बांधवांचे एकही मत भाजप व महायुतीचा छुपा पाठिंबा घेणाऱ्या शिंदेंना पडणार नाही असा विश्वास व्यक्त केला. खासदार डॉ.अमोल कोल्हे, हुजुर इनामदार व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या भाषणाने करमाळा तालुक्यासह छत्तीस गावातील मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रचार सभेत खासदार धैर्यशील मोहिते पाटील, शेतकरी नेते अतुल खूपसे, घटनेकर पाटील, कुर्डूवाडीचे नेते दत्तात्रय गवळी, म्हैसगावचे सरपंच सतीश उबाळे यांची भाषणे झाली.

व्यासपीठावर माढा तालुक्याचे नेते बी. डी पाटील(बप्पा) यांचेसह माढा तालुक्यातील अनेक मोठे नेते उपस्थित होते. यावेळी उमेदवार नारायण आबा पाटील यांना मुस्लिम बांधवांसह अनेक संघटनांनी पाठिंबा दिला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page