कुंभेजच्या बागल विद्यालयात केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धांचे आयोजन
करमाळा, दि. २९ (करमाळा-LIVE)-
जिल्हा परिषद शिक्षण विभाग सोलापूर अंतर्गत पंचायत समिती करमाळा आयोजित शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा घेण्यात येत आहेत त्या अनुषंगाने जेऊर केंद्राच्या क्रीडा स्पर्धांचे कुंभेज येथील बागल विद्यालयात आयोजन करण्यात आले. क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.हनुमंत पाटील यांचे हस्ते करण्यात आले . यावेळी पाटील यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
गटशिक्षण अधिकारी मा.श्री जयवंत नलवडे यांचे मार्गदर्शनानूसार विस्तार अधिकारी श्री.नितीन कदम व श्री.टकले यांच्या सहकार्याने
जेऊरचे केंद्राचे केंद्रप्रमुख मा श्री लक्ष्मण भंडारे यांनी विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेच्या पूर्वतयारीसह सर्व बाबींचे नियोजन केले
यावेळी सलामीच्या सामन्यात पंच म्हणून शिक्षक संजय भानवसे व भाऊसाहेब गायकवाड यांनी तर गुणलेखक म्हणून शिवाजी लोंढे व वेळ अधिकारी म्हणून बाबूराव पन्हाळकर यांनी जबाबदारी पार पाडली
या स्पर्धेत जेऊर केंद्रातील सर्व शाळांनी सहभाग नोंदवला
या वेळी बागल विद्यालयातील शिक्षक कल्याणराव साळुंके,सीताराम बनसोडे,संतोष शिंदे, विष्णू पोळ ,दादा जाधव, खो खो चे राष्ट्रीय पंच शहाबुद्दीन मुलाणी, एकनाथ झिंजाडे, दादा खटके कृष्णा काळेल, श्यामसुंदर सोहनी, भारत शिंदे,अच्युत कोल्हे,सतीश कात्रेला , किरण सानप, अमोल शिर्के, कुंडलीक केकान, वसंत बनकर, किसन कांबळे ,बापू चव्हाण ,श्रीमती रुक्मिणी कोळेकर ,श्रीमती मनीषा दुधे , श्रीमती आशा माळी ,श्रीमती वर्षा माळी आदि शिक्षक व शिक्षिका तसेच बलभीम वाघमारे, किशोर कदम, संतोष घोरपडे, नंदकुमार कांबळे उपस्थित होते.