जेऊरच्या भारत प्रायमरी स्कूलमध्ये आनंदी बाजार उत्साहात संपन्न

जेऊर, दि. ४ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील भारत प्रायमरी स्कूल मध्ये जरवर्षी प्रमाणे यावर्षीही इयत्ता पहिली ते चौथी व भारत माँटेसरी मधील विद्यार्थ्यांसाठी बाजारा डे चे आयोजन करण्यात आले होते.या बाजारासाठी विद्यार्थ्यांनी व पालकांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्त प्रसिद्ध प्रतिसाद दिला. या बाजाराचे उद्घाटन संस्थेचे सचिव अर्जुन सरक, भारत हायस्कूलचे प्राचार्य आबासाहेब सरवदे, भारत प्रायमरीचे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी भारत प्रायमरीमधील सर्व शिक्षक उपस्थित होते. या बाजार डे चे आयोजन सकाळी नऊ ते एक या वेळेत करण्यात आले होते यावेळी मुलांनी सकाळी नऊ वाजल्यापासूनच आपले स्टॉल लावण्यास सुरुवात केली.या बाजाराचे आयोजन कर्मयोगी गोविंद बापू पाटील हॉलमध्ये करण्यात आले होते. दैनंदिन जीवनात मुलांना गणिती व्यवहाराचे ज्ञान व्हावे यासाठी खास या बाजार डे चे आयोजन करण्यात आले होते. तसेच आपल्या शेतामधील शेतमाल विकण्याची संकल्पना मुलांमध्ये रुजावी.हाही यामागे शाळेचा हेतू होता.यावेळी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गणितीय व्यवहाराचे ध्यान मिळाल्यामुळे विद्यार्थी खूपच खुश होते .यामध्ये मुलांनी भाजीपाला फळभाज्या, मेवा, मिठाई, वडापाव, लिंबू सरबत शेतातील हरभरा, ड्रॅगन फ्रुट अशा अनेक पदार्थांची विक्री केली.यावेळी खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी स्टॉल लावले होते तसेच पालकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला. यामुळे या एकूण व्यवहारातून अंदाजे ६० हजार ते एक लाख रुपयाचे रुपयांची उलाढाल झाली.या बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी अनेक विद्यार्थी शेतकरी पोशाखामध्ये दिसून आले. विद्यार्थ्यांबरोबरच पालखी या बाजार डे मध्ये उत्साहाने सहभागी झाले होते तसेच यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी या बाजारडेला भेट दिली, संस्थेचे उपाध्यक्ष अनिलकुमार गादिया यांनी आवर्जून भेट दिली. जेऊरचे माजी उपसरपंच राजाभाऊ जगताप, ग्रामपंचायत सदस्या समिरा दोशी, व्यापारी संजयकुमार दोशी, सुयोग दोशी, रेणुका दोशी, प्रेमलता दोशी, ऐश्वर्या दोशी, समिधा दोशी, माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष वाघमोडे, राहुल गोडगे, नाथाराव रंदवे,भारत महाविद्यालयाच्या प्रा. कांबळे मॅडम, सकाळचे पत्रकार योगेश खंडागळे उपस्थित होते.यावेळी भारत प्रायमरी मधील मुख्याध्यापक दीपक व्यवहारे, अनिता देशमुख, अमोल पाटील, उत्तरेश्वर गरड, वर्षा भोसले, नितीन पाटील, गणेश हजारे, किशोर गुळमे, मुमताज शेख, सिंधू सरडे, एकूण अतिशय उत्तम प्रकारे बाजाराचे आयोजन केल्याबद्दल संस्थेचे संचालक पृथ्वीराज पाटील व संस्थेचे अध्यक्ष व करमाळा तालुक्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले.