दहिगावं येथील पाटील गटातील कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश
करमाळा, दि. २६ (करमाळा-LIVE)-
दहिगांव येथील माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात जाहीर प्रवेश केला आहे.
दहिगांव येथील युवानेते रोहिदास सलगर, अनिकेत शिंदे, परशुराम श्रीराम, सीताराम सलगर, वैभव शिंदे, विठ्ठल कांबळे, निखिल सातव यांनी आज शनिवारी २६ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता निमगाव येथील आमदार संजयमामा शिंदे यांच्या निवासस्थानी जाहीर प्रवेश करण्यात आला.
यावेळी आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते दहिगांव येथील प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
यावेळी निंभोरे गावचे सरपंच रविदादा वळेकर, उपसरपंच संतोष पाटील, धनंजय शिंदे, आर. व्ही. ग्रुप चे अध्यक्ष पप्पू मस्के, कन्हेरगांव चे धनंजय मोरे उपस्थित होते.