07/06/2025

आदिनाथ निवडणुकीसाठी आमदार आबा पाटलांसह महाआघाडीचे २१ उमेदवार रिंगणात ; महाआघाडीचे पारडे जड-

0
IMG-20250402-WA0056.jpg

करमाळा, दि. २ (करमाळा-LIVE)-
विद्यामान आमदार नारायण आबा पाटील यांच्यासह महाआघाडीचचे २१ उमेदवार निवडणुक रिंगणात उतरले असल्याची माहिती पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी दिली आहे.

आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून आजी माजी आमदारासह इतर काही जणांचे पॅनल जाहीर झाले आहेत. पाटील गटाच्या वतीने पॅनल बद्दल माहिती देताना तळेकर यांनी सांगितले की राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, जेष्ठ नेते माजी आमदार जयवंतराव जगताप, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व आमदार नारायण आबा पाटील, सावंत बंधू यांच्या एकत्रीत विचारातुन या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने
उमेदवार निवडलेले आहेत.

उमेदवार पुढील प्रमाणे आहेत-

जेऊर गट-
१) श्रीमांत त्रिंबक चौधरी (उमरड)
२) महादेव श्रीपती पोरे (कुगावं)
३) दत्तात्रय रामचंद्र गव्हाणे (पोपळज)

सालसे गट-
१) रविकिरण पोपट फुके (करंजे)
२) दशरथ येदू हजारे (जवळा)
३) आबासाहेब उर्फ वसंत शंकर अंबारे (गौंडरे)

पोमलवाडी गट-
१) किरण जगन्नाथ कवडे (कात्रज)
२) नवनाथ मधूकर झोळ (वाशिंबे)
३) संतोष खाटमोडे-पाटील (दिवेगव्हाण)

केम गट-
१)दत्तात्रय हरिश्चंद्र देशमुख (वांगी १)
२) विजयसिंह जिजाबा नवले (कंदर)
३) महेंद्र दिनकर फाटील (बिटरगावं)

रावगाव गट-
१) देवानंद गोपाळ बागल (मांगी)
२) अॕड राहुल सुभाष सावंत (करमाळा)
३) डाॅ अमोल नानासाहेब घाडगे (तरटगावं)

सोसायटी गट-
डाॅ हरिदास तुळशीराम केवारे (आळजापूर)

एस.सी राखीव प्रवर्ग गट (SC)-
राजेंद्र उर्फ राजाभाऊ भीमा कदम (उमरड)

महिला राखीव गट-
राधिका भीमराव तळेकर (वांगी)
उर्मिला हनुमंंत सरडे (चिखलठाण)

इतर मागासवर्ग गट (OBC)-
दादासाहेब नामदेव पाटील (बिटरगावं)

एन.टी (NT) गट-
आमदार नारायण आबा पाटील

असे एकूण २१ उमेदवार निवडणुकीत उतरले आहेत अशी माहिती प्रवक्ते सुनील तळेकर यांनी दिली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page