आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक बाळनाथ जगदाळे यांचे निधन
करमाळा, दि.2 (करमाळा-LIVE)- हिसरे येथील माजी सरपंच तसेच श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाळनाथ उर्फ नाना मनोहर जगदाळे (वय 65) यांचे आज पुणे येथे एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे.
त्यांच्यावर आज संध्याकाळी सात वाजता त्यांचे मूळ गावी हिसरे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितली आहे.