एटीएस (ATS) परिक्षेत वांगीचा अजिंक्य तकीक जिल्ह्यात दुसरा
जेऊर, दि. 26 (करमाळा-LIVE)-
राज्यस्तरीय एटीएस (ATS) प्रज्ञाशोध परिक्षेत इयत्ता पाचवीमध्ये वांगी-2 येथील अजिंक्य नितीन तकीक याने जिल्ह्यातून दुसरा क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे.
अजिंक्य हा जिल्हा परिषदेच्या वांगी-2 येथील प्राथमिक शाळेचा विद्यार्थी असून त्याने 26 मार्च 2023 रोजी ही परीक्षा दिली होती यामध्ये 300 पैकी 266 गुण मिळवून त्याचा जिल्ह्यात दुसरा तर तालुक्यात प्रथम क्रमांक आला आहे.
त्याच्या या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक व वांगी परिसरातील विविध क्षेत्रातील मंडळींकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.