कुंभेजचे डाळींब उत्पादक मुटके यांच्यावतीने स्वामी समर्थ भक्तांना फळे वाटप

विश्वस्त संपतराव शिंदे व मान्यवरांच्या हस्ते भाविकांना डाळींब फळे प्रसाद वाटप
करमाळा, दि. १० (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील कुंभेज येथील प्रगतशील डाळिंब उत्पादक शेतकरी आणि माजी सैनिक सुभाष मुटके यांनी आपल्या शेतात पिकवलेले डाळींब पौर्णिमेचे औचित्य साधत अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात श्री स्वामी समर्थाच्या चरणी अर्पण केले व श्रींच्या नैवेद्य आरती नंतर देवस्थान समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनानुसार देवस्थान विश्वस्त तथा माजी सभापती संपतराव शिंदे पाटील सेवानिवृत्त डीवायएसपी तुकाराम गोडगे, लेबर फेडेरेशन संचालक मानसिंग खंडागळे यांच्या हस्ते उपस्थित भाविकांना हे डाळींब फळे प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले.
या प्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, प्रसाद सोनार, ऋषिकेश लोणारी व अन्य भाविक भक्त उपस्थित होते.