जेऊर व माढा येथे हुतात्मा एक्सप्रेसला थांबा मिळवण्यासाठी प्रयत्नशील ; धैर्यशील मोहिते-पाटील
करमाळा, दि. 25 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर व माढा रेल्वे स्थानकावर सोलापूर-पुणे हुतात्मा एक्सप्रेसला थांबा मिळविण्यासाठी रेल्वेचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भाजप नेते धैर्यशील मोहिते-पाटील यांनी पत्र लिहून प्रवासी थांबण्याची मागणी केली आहे.
सोलापुर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील लोकांना सोयीचे असलेल्या जेऊर व माढा रेल्वे स्टेशनवर नेहमी प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. पुणे येथे दररोज शाळा काॅलेजचे विद्यर्थी, व्यापारी, नोकरदार वर्ग व हाॅस्पीटल्स करीता ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. या रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोईकरता हुतात्मा एक्सप्रेसचा थांबा आवश्यक आहे.
सोलापूर-पुणे हुतात्मा एक्सप्रेसला थांबा मिळाल्यास या शहरातील व परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होईल, तसेच शिक्षण व्यवसायांच्या दृष्टीने या शहरांच्या विकासाला चालना मिळेल. दळण वळणाच्या दृष्टीने हुतात्मा एक्सप्रेसचा थांबा सोयीचा व गरजेचा असून रेल्वे मंत्रालय व रेल्वे बोर्डाकडे पाठपुरवा करणार असल्याचे धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी सांगितले.
- रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरीच्या जाचक अटी शिथिल करा- भाजप जिल्हा सचिव लक्ष्मण केकान
- करमाळ्यात मराठा कुणबी प्रकरणासाठी अडवणूक ; ऐजंट आणि अधिकाऱ्यांमध्ये मिलीभगत- युवासेनेचा धरणे आंदोलनाचा इशारा
- भाळवणीच्या तृप्ती वाघमारे चे नीट (NEET) परीक्षेत घवघवीत यश
- कुंभेजच्या बागल विद्यालयात केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धांचे आयोजन
- २०१४ ला २५७ चा मटका नव्हता, जनतेचा कौल होता! हे २०२४ लाही जनतेने दाखवून दिले ; विरोधकांना पाटील गटाचा “हाबाडा”