17/12/2024

सोशल मिडीयावर सामाजिक बांधिलकी; उमरड येथील अपघातात जखमी कार्तिक चांदणे याला मिळाली आर्थिक मदत

0
IMG_20230327_142507.jpg

चिखलठाण, दि. 27 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील उमरड येथील मोटारसायकल अपघातात गंभीर जखमी असलेल्या कार्तिक चांदणे या तरुणाच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांनी सोशल मिडियावर केल्यानंतर सामाजिक बांधिलकी जपत चार तासात चाळीस हजार त्याच्या आईच्या खात्यावर चाळीस हजार रूपये मदत जमा झाली आहे.

उपरड येथील कार्तिक अंगद चांदणे या एकोणीस वर्षीय तरूणाचा पंधरा दिवसांपूर्वी कुंभेजफाटा परिसरात मोटारसायकल अपघात झाला, यामध्ये त्याला जबर मार लागल्याने पुणे येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी पाठवले होते.आठ दिवस त्याची शुद्ध हरपलेल्या अवस्थेत उपचार सूरू होते सध्या या तरुणाची प्रकृती सुधारत आहे. या तरूणाचे वडील मजुरी करतात तर आई अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करते जमीन किंवा आर्थिक उत्पन्नाचे खात्रीशीर साधन नसल्याने परिस्थिती हालाकिची आहे.त्यांच्या जवळील व नातेवाईकांनी दिलेले बरेच पैसे उपचारासाठी खर्च झाले आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय साह्यता कक्षाकडे सहकार्याची मागणी केली आहे. तरीही उपचारासाठी खर्च मोठा असल्याने उमरड येथील सामाजिक कार्यकर्ते प्रा.नंदकिशोर वलटे यांनी या तरूणांच्या उपचारासाठी आज सकाळी मदत करण्याचे आवाहन सोशल मीडियावरून केल्यानंतर सामान्य लोकांमधून अवघ्या चार तासात पाचशे हजार रूपयांच्या माध्यमातून चाळीस हजार रुपये मदत त्यांच्या आईच्या 9557696172 या फोन पे नंबर वरून बॅंक खात्यावर जमा झाली आहे.

मदतीचा ओघ सुरू असून या निमित्ताने परिसरातील लोकांच्या माणुसकीचे दर्शन घडत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page