17/12/2024

अन्विता बोराटे एटीएस (ATS) परीक्षेत जिल्ह्यात प्रथम

0
IMG_20230531_230635.jpg

करमाळा, दि. 1 (करमाळा-LIVE)-
मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय एटीएस (ATS) परीक्षेत अन्विताने इयत्ता दुसरीत 200 पैकी 188 गुण मिळवत सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.

कु. अन्विता सध्या जि. प. शाळा निंबाळकर वस्ती येथे इयत्ता दुसरीत शिकत असून तिला या परीक्षेसाठी महेश साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले.

तिच्या या यशाबद्दल गटविकास अधिकारी मनोज राऊत, गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील, विस्तार अधिकारी जयवंत नलवडे, केंद्रप्रमुख श्री तोरमल सर, मुख्याध्यापक श्री ठाकर सर, वांगीचे माजी सरपंच विठ्ठल शेळके, शाळा व्यवस्थापन समिती निंबाळकर वस्ती तसेच वांगी परीसरातील सर्व नागरिकांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page