आषाढी एकादशी : यंदा बकरी ईदला कुर्बानी देणार नाही- जेऊर मधील मुस्लिम बांधवांचा आदर्श निर्णय
जेऊर, दि. 24 (करमाळा-LIVE)-
यंदा गुरूवारी 29 जूनला आषाढी एकादशी असून याच दिवशी बकरी ईद सण आहे. यावर्षी बकरी ईदला दिली जाणारी कुर्बानी त्या दिवशी न देता दुसऱ्या दिवशी देण्याचा आदर्श निर्णय करमाळा तालुक्यातील जेऊर येथील मुस्लिम बांधवानी घेतला आहे.
या निर्णयामुळे मुस्लिम बांधवांचे कौतुक करण्यात येत आहे.