08/06/2025

करमाळा : बहुजन मराठी पत्रकार संघाच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन

0
IMG_20230613_223944.jpg

करमाळा, दि. 14 (करमाळा-LIVE)-
करमाळ्यातील बहुजन मराठी पत्रकार संघाच्यावतीने दहावी व बारावी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

दि. 17 जून रोजी शनिवारी सकाळी 11:35 वाजता पंचायत समिती सभागृहात सन्मान सोहळा होणार असून हा सन्मान सोहळा करमाळा तालुक्यातील सर्व अधिकारी व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत विद्यार्थीसह पालक शिक्षक यांचा होणार आहे.

दहावी आणि बारावी बोर्ड परिक्षेत पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक, तिसरा क्रमांक, मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बहुजन मराठी पत्रकार संघ शाखा करमाळा यांच्या वतीने तालुक्यातील सर्व अधिकारी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी तालुक्यातील विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page