कोर्टीच्या सरपंच भाग्यश्री नाळे-मेहेर यांना ग्रामररत्न सरपंच पुरस्कार जाहीर

करमाळा, दि. १८ (करमाळा-LIVE)-
कोर्टी येथील सरपंच भाग्यश्री सुदाम नाळे-मेहेर यांना महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचा ग्रामरत्न सरपंच पुरस्कार जाहीर झाला आहे.
सरपंच भाग्यश्री नाळे-मेहेर यांनी गावासाठी विविध विकाकामे केली आहेत. विधवा महिला, वयोवृद्ध नागरिकांना शासनाच्या संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतून लाभ मिळवून दिला आहे तसेच गावामध्ये प्रधानमंत्री, रमाई, यशवंतराव चव्हाण, अहिल्यादेवी होळकर वसाहत योजना अशा विविध योजनेतून गोर गरिबांना हक्काचा निवारा उपलब्ध करून दिला त्याचबरोबर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत.
त्यांच्या या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय सरपंच परिषदेमार्फत दिला जाणारा ग्रामरत्न सरपंच पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा लोणावळा येथे दिनांक ७ व ८ऑक्टोबर रोजी होणार आहे असे सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील, राज्य उपाध्यक्ष शशिकांत मोरे, लक्ष्मण ढाणे यांनी सांगितले.