भाळवणी येथे यात्रेच्या छबिन्यात नाचत का नाही म्हणून एकास बेदम मारहाण


जेऊर, दि. 14 (करमाळा-LIVE)-
भाळवणी येथे यात्रेच्या छबिन्यात नाचत का नाही म्हणून एकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.
याबाबत हकीकत अशी की, करमाळा तालुक्यातील भाळवणी येथे मंगळवारी भैरवनाथ देवस्थानची यात्रा पार पडली. यात अजिंक्य ज्ञानदेव शिंदे यांनी फिर्याद दिली आहे की, मंगळवारी रात्री यात्रेत छबिना निघाला, पहाटे चार च्या सुमारास गावातील राहुल फरतडे याने मला छबिन्यात नाचण्यास चल असे म्हटले, मी नाचण्यास नकार दिला म्हणून त्याने मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तू तक्रार का दिली म्हणून जातिवाचक शिवीगाळ करून त्याने व त्याचा भाऊ तानाजी फरतडे आशा दोघांनी बेदम मारहाण केली या प्रकरणी दोघांविरूध्द करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणी पुढील तपास प्रविण साने हे करीत आहेत.
