भाळवणी- अबब.! गायीने दिला चक्क तीन कालवडांना जन्म; करमाळा तालुक्यातील पहिलीच घटना
जेऊर, दि. 29 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील शेतकरी सौदागर हिरालाल वाघमारे यांच्या गायीने आज तीन कालवडांना जन्म दिला असून करमाळा तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे.
भाळवणी येथील शेतकरी सौदागर वाघमारे आणि मनिषा वाघमारे या शेतकरी दाम्पत्यांच्या जर्सी गायीने आज तीन कालवडांना जन्म दिला असून तीनही कालवडच आहेत तसेच ही कालवडे चांगले असून भाळवणी गावात जन्मलेल्या कालवडांना पाहण्यासाठी गर्दी केलेली असून हा निसर्गाचाच चमत्कार असून करमाळा तालुक्यातील ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जाते.