भारत शिक्षण संस्थेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न
जेऊर, दि. 14 (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील भारत शिक्षण संस्थेचा बक्षीस वितरण कार्यक्रम भाग दोन नुकताच पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ संचालक विलास पाथरूडकर, प्रमुख पाहुणे म्हणून युवानेते पृथ्वीराज पाटील उपस्थित होते तर प्रमुख वक्ते म्हणून भीष्माचार्य चांदणे उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव प्राध्यापक अर्जुन सरक, प्राचार्य केशव दहिभाते, उपप्राचार्य एन डी कांबळे, पर्यवेक्षक बी एस शिंदे, प्रायमरीचे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे, शिक्षक चिटणीस एच. बी. रुपनवर आदि उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन भाषणात भीष्माचार्य चांदणे यांनी आनंदी राहण्याचा सल्ला दिला. जीवनात उत्तम मित्र बनवण्याचा सल्ला दिला. जो तुमच्या संकटात उभा राहिल. असा मित्र बनवण्याची आव्हान त्यांनी केले. कमी गुण मिळाले म्हणून दुःखी होऊ नका त्याचा विचार न करता आनंदी राहण्याचा सल्ला त्यांनी दिला. कर्मयोगी गोविंद बापू यांच्या पदस्पर्श लाभलेल्या संस्थेत तुम्ही शिकत आहात हे तुमचे भाग्य आहे असे म्हणाले. यावेळी संस्थेतील सर्व विद्यार्थी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सर्वप्रमुख पाहुण्यांच्या हस्ते व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगद पठाडे यांनी केले. यावेळी शिशु एक ते बारावी पर्यंत विद्यार्थ्यांची बक्षीस वाटप करण्यात आले.