जेऊरच्या भारत प्रायमरी स्कूलमध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती तर लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी

जेऊर, दि. ३ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील भारत प्रायमरी स्कूल साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळी दोन्ही फोटोंची पूजा करण्यात आली. तसेच लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांची माहिती विद्यार्थ्यांना सांगण्यात आली. यावेळी इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांची भाषणे झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी थोडक्यात अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळकांविषयी माहिती सांगितली.
यावेळी मुख्याध्यापकांच्या हस्ते दोन्ही महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक दीपक व्यवहारे, अमोल पाटील, अनिता देशमुख, किशोर गुळमे, वर्षा भोसले, नितीन पाटील सर, उत्तरेश्वर गरड, गणेश हजारे इत्यादी शिक्षक व सर्व विद्यार्थी व पालक हजर होते.