‘विठ्ठल नामाची शाळा भरली! जेऊरच्या भारत मॉंन्टेसरी व प्रायमरी स्कूलच्या वतीने बाल दिंडी सोहळ्याचे आयोजन

जेऊर, दि. ४ (करमाळा-LIVE)-
आषाढी एकादशी निमित्ताने जेऊर येथील भारत मॉन्टेसरी व भारत प्रायमरी स्कूल ची बाल दिंडी उत्साहात संपन्न झाली.
जर वर्षाप्रमाणे यावर्षीही भारत प्रायमरी व भारत मॉन्टेसरीची बालदंडी मोठ्या उत्साहामध्ये आयोजित करण्यात आली होती. या दिंडीमुळे बालगोपाळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह दिसून आला.
सकाळपासूनच मुली साड्या घालून व मुले वारकऱ्यांचा गणवेश घालून शाळेत आली होती, सर्वच विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला.
भारत माँटेसरी भारत प्रायमरी स्कूलच्या मुला मुलींची बाल दिंडी शाळेतून ते एसटी स्टँड विठू नामाचा गजर करीत फुगडी चा खेळ करीत फेरी मारण्यात आली, संस्थेचे उपाध्यक्ष अनिलकुमार गादिया यांनी दिंडीचे स्वागत तोफा उडवून व मुलांना बिस्कट पुडे वाटप करून स्वागत केले.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजयकुमार दोशी यांनी ही सर्व मुलांना बिस्किट वाटप केले. तसेच पालक दीपक बोराडे , भूषण लुंकड, अजय सोळंकी यांनीही चॉकलेटचे वाटप केले. तसेच पखवाज वादक भागवत सरक व विठ्ठलभक्त भीमराव कोंडलकर यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले.
माँटेसरी व प्रायमरीच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.