शाळा सुरू ; मुला-मुलींनी बहरले भारत प्रायमरी स्कूलचे प्रांगण
जेऊर, दि. २० (करमाळा-LIVE)-
शाळा सुरू झाल्यामुळे मुला-मुलींनी जेऊर येथील भारत प्रायमरी स्कूलचे प्रांगण बहरले आहे.
नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात भारत प्रायमरी स्कूल या शाळेत इयत्ता पहिलीतील नवीन प्रवेश घेतलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प गोड गोड खाऊ तसेच औक्षण करून स्वागत करण्यात आले. फुगे देऊन तसेच फुलांचा वर्षाव करून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
शाळेने विद्यार्थिनींच्या, विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आकर्षक रांगोळी कार्टून, फुग्याचे सजावट, सेल्फी पॉईंट करून आनंददायी वातावरण निर्माण केले होते. आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे, याप्रमाणे वातावरण झाले होते.
यावेळी शाळेचा पहिलाच दिवस असल्यामुळे सर्व विद्यार्थी आनंदी होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल कुमार गादिया व मान्यवरांच्या हस्ते समग्र शिक्षा अंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक दिपक व्यवहारे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली तर शाळेची गुणवत्ता, शाळेने केलेली प्रगती इत्यादी माहिती दिली.
यावेळी संस्थेचे सचिव अर्जुनराव सरक, सरपंच पृथ्वीराज पाटील, भारत हायस्कूलचे प्राचार्य केशव दहिभाते, उपप्राचार्य नागेश कांबळे, पर्यवेक्षक बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.
भारत प्रायमरी स्कूल मध्ये स्पर्धा परीक्षा बरोबर विविध कार्यक्रम वर्षभर राबवत असणारी शाळा असून इथून आजपर्यंत हजारो विद्यार्थी उच्च स्थानी गेल्याचे सचिव साहेब यांनी नमूद केले. संपूर्ण जिल्ह्याला स्पर्धा परीक्षांची ओळख करून देणारे तसेच वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना घडवणारे भारत प्रायमरी स्कूल,व भारत हायस्कूल ही शाळा एकमेव संस्था आहे. असे मत संचालक पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक अमोल पाटील, उत्तरेश्वर गरड, नितीन पाटील, अनिता देशमुख, वर्षा भोसले, गणेश हजारे, किशोर गुळमे परिश्रम घेतले.