जेऊरच्या भारत प्रायमरी स्कूल मध्ये क्रीडा स्पर्धा संपन्न


जेऊर, दि. 15 (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील भारत प्रायमरी स्कूल मध्ये क्रीडा स्पर्धा संपन्न झाली.
दि.9 आणि 10 डिसेंबर रोजी विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा पार पडल्या. सदरील सामने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी घेण्यात आले, यामध्ये हे सामने दोन गटात घेण्यात आले गट क्रमांक एक व गट क्रमांक दोन या पद्धतीने सामने घेण्यात आले. यामध्ये धावणे, चेंडू फेक, लंगडी, लिंबू चमचा, दोरीवर उड्या अशा प्रकारचे सामने घेण्यात आले या दोन दिवसांमध्ये अभ्यासाला सुट्टी आणि भरपूर खेळायला मिळाल्यामुळे बच्चे कंपनी खुश झाली होती. या सामन्यांसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.


