निंभोरे परिसरात दिसला बिबट्या?
निंभोरे येथील शेतकऱ्यांचा फोन अॕडिओ क्लिप व्हायरल

करमाळा, दि. 11 (करमाळा-LIVE)-
गेल्या दोन दिवसांपासून देवळाली- विहाळ परिसरात बिबट्या असल्याची चर्चा सुरू असताना आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास निंभोरे परिसरात बिबट्या असल्याचे निदर्शनास आले असून बिबट्या पाहिलेल्या शेतकऱ्यांचे फोन अॕडिओ क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल झालेले आहेत.
दरम्यान खरच बिबट्या होता की अन्य प्राणी होता हे प्रशासनाकडून अजून पर्यंत पुष्टी करण्यात आलेली नाही. तरी देखील नागरिकांनी सतर्क रहावे.
निंभोरे परिसरात बिबट्या असल्याचे व्हायरल झालेले अॕडिओ क्लिप डाऊनलोड बटन क्लिक करून ऐका-

