आमदार गोपीचंद पडळकर यांचा उद्या करमाळा दौरा ; ‘धनगरी रुद्रनाद’ कार्यक्रमाबाबत साधणार संवाद

करमाळा दि. २२ (करमाळा-LIVE)-
बहुजन हृदय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर उद्या करमाळा येथे येणा असून जनतेशी संवाद साधणार आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रीशताब्दी जयंतीच्या निमित्ताने आयोजित “धनगरी रूद्रनाद” कार्यक्रमा बाबत अहिल्याप्रेमी जनतेशी आमदार पडळकर संवाद साधणार आहेत.
अहिल्याप्रेमी जनतेने उद्या बुधवारी सकाळी १०.३० वाजता जुने विश्रामगृह येथे सकाळी उपस्थित रहावे असे आवाहन सकल धनगर समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची यावर्षी तिनशेवी जयंती आहे. सन २०२५ या वर्षात महाराष्ट्र सह देशभर विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत. दि ३१ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहिल्या जन्मस्थळ चौंडी या ठिकाणी येत आहेत. अहिल्यादेवी होळकर यांच्या सन्मानार्थ पुढील आठवड्यात चौंडी येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक देखील येथे होत आहे.
थोडक्यात शासनाच्या पातळीवर तसेच विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून त्रीशताब्दीचे भव्यदिव्य असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
असाच एक कार्यक्रम “पुण्यश्लोक@ ३००” निमीत्ताने पन्नास हजार ढोल वादनाचा विश्वविक्रम नोंदवणारा कार्यक्रम पुण्यात १५ मे रोजी आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमास केंद्रीय ग्रहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमात धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवींना अभिवादन करताना आदिम धनगरी संस्कृतीचे दर्शन जगभरातील जनतेला घडविण्यासाठी पन्नास हजार धनगरी ढोल वादनाचा “धनगरी रूद्रनाद” हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमात राज्यभरातील अहिल्याप्रेमी जनतेचा उस्फूर्त सहभाग वाढविण्यासाठीव या कार्यक्रमाची रूपरेखा लोकांना सांगण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर हे राज्यभर दौरा करत आहेत.
या दौर्यादरम्यान पडळकर करमाळा येथे संवाद साधून सहभाग वाढविण्यासाठी, नियोजनाबद्दल माहिती देण्यासाठी करमाळा येथे उद्या बुधवारी सकाळी ११.०० वाजता करमाळा येथे येत आहेत.