20/10/2025

करमाळ्याची जागा भाजपला मिळावी ; गणेश कराड यांनी केली श्रीकांत भारतीय यांच्याकडे मागणी

0
IMG_20241021_073652.jpg

करमाळा, दि. २१ (करमाळा-LIVE)
करमाळा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची ताकत व आज पर्यंत करमाळा विधानसभा मतदारसंघात झालेली सर्व महत्त्व पूर्ण विकास कामे ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळात झालेली आहेत. त्यामुळे येथील जागा कमळ या चिन्हावर लढवावी अशी मागणी भाजप प्रदेश ओबीसी सेलचे सचिव गणेश कराड यांनी भाजप निवडणूक व्यवस्थापण प्रमुख श्रीकांत भारतीय यांची मुंबई येथे भेट घेत केली.

यावेळी करमाळा तालुक्यात आज पर्यंत झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकालातील अहवाल सादर केला.करमाळा तालुक्यामध्ये भाजप परिवाराचा मतदार मोठ्या प्रमाणात असून देखील प्रत्येक विधानसभा निवडणुकीमध्ये जागा मित्र पक्षाला सुटलेली आहे यावेळेस जागा भाजपला सोडावी भाजपला मतदान करण्यासाठी मतदार उत्सुक असून यावेळेस महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीला जागा सोडण्यात यावी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना तालुक्यामध्ये अनेक रस्ते तसेच प्रकल्प पूर्णत्वास गेलेले आहेत त्यामुळे देवेंद्रजी यांचे नेतृत्व मतदार स्वीकारतात. केंद्र व राज्य शासनाचे योजना लाडकी बहिणी योजना यामुळे शेतकरी महिला वंचित घटकांमध्ये भाजपच्या बाजूने मोठ्या प्रमाणात कल दिसून येत आहे. केंद्रात सरकार असल्यामुळे राज्यात भाजपला विकास कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे.त्यामुळे करमाळा विधानसभा मतदारसंघ कमळ या चिन्हावर लढवण्याची मागणी केली.

यावेळी श्रीकांत भारतीय यांनी करमाळा मतदारसंघ कमळ चिन्हावर लढविण्यासंदर्भात महायुतीतील घटक पक्षांशी सकारात्मक चर्चा सुरू असून सविस्तर चर्चा करून निर्णय घेऊ असे आश्वासन दिल्याचे कराड यांनी बोलताना सांगितले.

रिटेवाडी उपसा सिंचन योजना उजनी जलाशयावरील पूल, तालुक्यातील रस्ते शहरातील एमआयडीसी याबरोबरच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना जनसामान्य पर्यंत पोहोचवण्यासाठी गणेश कराड कार्यरत राहिलेले आहेत भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवार दिल्यास विधानसभेबरोबरच येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीसह तसेच पक्ष संघटन या गोष्टी गांभीर्याने होतील यामुळे गणेश कराड यांना भारतीय जनता पार्टी च्या वतीने महायुतीमधून करमाळा विधानसभेला उमेदवारी द्यावी.
नरेंद्रसिंह ठाकुर, जिल्हा सरचिटणीस भाजपा किसान मोर्चा, सोलापूर पश्चिम

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page