चांद्रयान-3 मोहिम यशस्वी ; बार्शी तालुक्यातील घाणेगावंच्या वैष्णवी पाटील यांनी बजावली महत्त्वाची भूमिका
करमाळा, दि. 23 (करमाळा-LIVE)-
भारताने आज इतिहास रचत चांद्रयान-३ चे यशस्वी लँडींग केले. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील घाणेगावं येथील महिला शास्त्रज्ञाचाही सहभाग आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील घाणेगावंच्या कन्या व शास्त्रज्ञ वैष्णवी प्रभाकर पाटील यांनी या चांद्रयान मोहिमेत महत्वाची भूमिका बजावली आहे. चांद्रयान -३ या मोहिमेत बार्शी तालुक्यातील घाणेगावच्या कन्या वैष्णवी पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याचे नाव पूर्ण भारतभर केले आहे. त्यांच्या या यशात बाकीच्या सर्व शास्त्रज्ञांचाही तेवढाच वाटा आहे.
जगभरात कुतुहलाचा विषय झालेल्या या मोहिमेत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील घाणेगावच्या कन्या वैष्णवी पाटील यांचा सहभाग असल्याने जिल्हाभरात त्यांचे कौतुक होत आहे.