08/06/2025

चिखलठाण येथील इरा पब्लिक स्कूलमध्ये पर्यावरण पुरक गणेशोत्सव ; विद्यार्थ्यांनी बनविल्या इको फ्रेंडली गणेश मुर्ती

0
IMG-20230919-WA0029.jpg

चिखलठाण, दि. 18 (करमाळा-LIVE)-
चिखलठाण येथील इरा पब्लिक स्कूलच्या वतीने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी पर्यावरण जागृतीसाठी विद्यार्थ्यांनी मातीपासून इको फ्रेंडली गणेशमुर्ती बनविल्या आहेत.

पर्यावरण जागृती व प्रदूषणाच्या दुष्परिणामाची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी चिखलठाण येथील इरा पब्लिक स्कूलमध्ये इको फ्रेंडली गणेशमुर्ती बनविण्याची एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. पारंपारिक गणेश मूर्तीत प्लॅस्टर ऑफ पॅरिस व केमिकल चा उपयोग असतो. यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ ब्रिजेश बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यशाळेत जल प्रदूषण व वायू प्रदूषणला आळा घालण्यासाठी कोणत्याही केमिकलचा वापर न करता शेतातल्या काळ्या भोर मातीने या गणेश मुर्ती बनवण्यात आल्या.

या वेळी नर्सरी ते इयत्ता चौथी च्या सर्व विद्यार्थ्यानी व शिक्षकानी सहभाग नोंदविला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page