चिखलठाण येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त कृषी विभागाच्या वतीने महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन

शेटफळ, दि. 20 (करमाळा-LIVE)-
मकर संक्रांत सणाचे औचित्य साधत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये वर्ष 2023 अंतर्गत करमाळा तालुका कृषी अधिकारी एम डी वाकडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चिखलठाण येथे प्रगतशील महिला शेतकरी मनीषा भाऊसाहेब सरडे यांच्या शेतात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
कृषी सहाय्यक रोहिणी सरडे यांनी पौष्टिक तृणधान्य दिन याबाबत सविस्तर माहिती दिली तृणधान्य पिकापासून बनवण्यात येणाऱ्या विविध उपपदार्थांबाबत माहिती दिली. यावेळी श्रीमती एस बी शेलार कृषी शेटफळ यांनी उपस्थित महिलांना तृणधान्य पिकांच्या विविध जाती तसेच लागवड तंत्रज्ञान या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले तसेच कृषी विभागाच्या वतीने महिला शेतकऱ्यांना हळदी कुंकू तिळगुळ तसेच वाण म्हणून पुष्परोपे देऊन उपक्रमाची गोड सांगता करण्यात आली अशा प्रकारे पौष्टिक तृणधान्य दिनाचा व्यापक प्रचार व प्रसिद्धी कृषी विभागामार्फत करण्यात आली या कार्यक्रमाला चिखलठाण येथिल महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

