17/12/2024

करमाळा मतदारसंघातील अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध- आमदार संजयमामा शिंदे

0
IMG-20241015-WA0077.jpg

करमाळा, दि. १६ (करमाळा-LIVE)-
करमाळा मतदारसंघातील अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध राहू असे आश्वासन आमदार संजयमामा शिंदे यांनी येथे बोलताना दिले.

करमाळा शहरातील ईदगाह मैदान परिसर सुशोभिकरण व वॉल कंपाउंड बांधणे, सुलेमानी मस्जिद(आनंदबाग रोड) समोरील रस्ता काँक्रीटीकरण करणे,मुलाणवाडा दफनभूमी वॉल कंपाउंड व पोहोच रस्ता करणे, बेग-फकीर दफनभूमी वॉल कंपाउंड बांधणे, फारूक जमादार घर परिसरात काँक्रीटीकरण व पेव्हिंग ब्लॉक्स बसविणे या विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते विवेक येवले, अॕड राहुल सावंत, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भरत आवताडे, माजी नगरसेवक प्रविण जाधव, बापू तांबे, देवा लोंढे, संतोष सापते, माजी उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी, माजी नगरसेवक नजीर अहमद कुरेशी, अर्बन बॅंकेचे माजी संचालक कलिम काझी, अर्बन बँकेचे माजी व्हाईस चेअरमन फारूक जमादार, भोसे माजी सरपंच भोजराज सुरवसे, संभाजी ब्रिगेडचे राज्य प्रवक्ते हर्षल बागल, रावगावचे माजी सरपंच दादासाहेब जाधव, एकलव्य आश्रमशाळेचे अध्यक्ष रामकृष्ण माने, गुळसडीचे माजी सरपंच मानसिंग खंडागळे, देवळालीचे संतोष गायकवाड, उद्योजक संतोष कुलकर्णी, सकल मुस्लिम समाजाचे शहराध्यक्ष जमीर सय्यद, विशाल कुभांर, सोहेल पठाण, ईस्माइल मुलाणी, तौफीक शेख, आझाद शेख, सुरज शेख, हाजी महमदआली शेख, समीर शेख, पिन्टु बेग, गुळसडीचे इक्बाल शेख, जहॅागीर बेग, सोहेल पठाण, हाजी उस्मान सय्यद, हाजी इस्माइल मुलाणी, अलीम खान, पत्रकार राजु सय्यद, उमर मदारी, चाँद बेग, जावेद शेख, आलीम पठाण, जिलानी खान, राजु बेग, चॅांद बेग, शाहिद बेग, आरबाज बेग, शाहरुख शेख आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा बार्शी विधानसभा निरीक्षक अशपाक जमादार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page