08/06/2025

कोरोनाची दहशत संपली परंतु अस्वस्थता आजही कायम ; लॉकडाऊन ला आज चार वर्षे पूर्ण- जेऊर मध्ये २७ जुलैला सापडला होता पहिला कोरोना पॉजिटीव्ह

0
IMG-20240322-WA0004.jpg

जेऊर, दि. २२ (करमाळा-LIVE)-
सगळ्या जगाला लागलेली कोरोनाची दहशत संपली असली तरी अस्वस्थता आजही कायम असून लॉकडाऊनला आज चार वर्षे पूर्ण झाली आहेत. २२ मार्च २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन ची घोषणा केली होती.

तर सोमवार दि. 27 जुलै 2020 ला जेऊर मध्ये पहिला कोरोना पॉजिटीव्ह आढळून आला आणि शहरातील कोरोना जेऊर मध्ये पोहोचला. संपूर्ण गाव अलर्ट झाले, परंतु कोरोना ऐकण्याच्या मनस्थितीत कुठे होता.

जेऊर मध्ये पहिल्या कोरोना पॉजिटीव्ह नंतर कोरोनाची संख्या वाढतच गेली, आजपर्यंत करमाळा-LIVE न्यूज पोर्टलला (www.karmalalive.in) मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार जेऊर मध्ये एकूण 1785 रुग्ण पॉजिटीव्ह आढळलेले असून आजपर्यंत 23 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. पहिल्या लाटे पेक्षा दुसरी लाट यापेक्षाही खूपच घातक होती, प्रत्येक घरात एक पॉजिटीव्ह अशी परिस्थिती होती, जेऊर स्मशानभुमीत एके दिवशी तर वेटींग पहायला मिळाल्याची परिस्थिती होती, संपूर्ण गाव कोरोनाच्या दहशत मध्ये होते. दहशत आज संपली असली तरी आजही कोरोनाची आठवण काढली तर अस्वस्थता मात्र नक्कीच निर्माण होते. जेऊर गावात असे काही कोरोना पॉजिटीव्ह आणि मृत्यूच्या घटना घडलेल्या आहेत की आजही मन सुन्न करणारी आहेत.

कोरोनाच्या दोन वर्षात जेऊर मधील वेगवेगळ्या संघटना, संस्था, सामाजिक कार्यकर्ते, कोरोना समिती, ग्रामपंचायत यांचे मोलाचे सहकार्य लाभले. जनजागृती, एकमेकांना आर्थिक, वैद्यकीय मदत सढळ हाताने मिळाली, जेऊर मधील सर्व लोक जात-पात-धर्म सोडून मदतीला धावून येत होते.

जेऊर मध्ये असणाऱ्या बाजारपेठेतून ही सहकार्याची भावना सर्वांना मिळाली, लॉकडाऊन नियम पाळणे, शासनाने दिलेल्या नियमांचे वेळेनुसार पालन करणे आदी. तसेच जेऊर मधील “जेऊर व्यापारी संघटना” या व्हट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ही सामाजिक कार्य, वेळोवेळी कोरोना अपडेट, लॉकडाऊन, वैद्यकीय मदत, आवाहन, एकमेकांच्या सुख- दुःखात सामील होणे, अस्वस्थता कमी करण्यासाठी मनोरंजन, जोक्स, मोटीव्हेशनल व्हिडीओ टाकणे तसेच ग्रुपमधील जेष्ठ व्यापारी, डॉक्टर्स यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आणि लाभत आहे. कोरोना अजूनही संपलेला नाही, दोन वर्षांपूर्वी असणारी दहशत कमी झालेली परंतु अस्वस्थता आजही कायम आहे.

महत्त्वाची नोटकोरोना संबंधित दिलेली आकडेवारी ही सोशल मिडीया, सरकारच्या माहिती नुसार असून त्यामध्ये बदल होऊ शकतात.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page