केडगाव येथील बलात्कार ॲट्रॉसिटी प्रकरणी एकास जामीन मंजूर
सदर प्रकरणी आरोपीतर्फे अॕड निखिल पाटील व अॕड विनोद चौधरी यांनी काम पाहिले
करमाळा, दि. 25 (करमाळा-LIVE)-
केडगावं येथील बलात्कार ॲट्रॉसिटी प्रकरणी एकास जामीन मंजूर झाला आहे.
यात हकीकत अशी की, पोपट भानुदास जाधव रा. झरे तालुका करमाळा याच्याविरुद्ध केडगावं ता करमाळा येथील एका महिलेने भा.द.वि कलम 376 506 व अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम तीन प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
सदर गुन्ह्यामध्ये त्यास दि. ०२/०८/२०२३ रोजी अटक करण्यात आली होती. तद् नंतर यातील आरोपीने अॕड निखिल पाटील व अॕड विनोद चौधरी यांचे मार्फत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बार्शी येथे धाव घेतली होती, सदर प्रकरणाची सुनावणी बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश माननीय श्री जे.सी.जगदाळे साहेब यांच्यासमोर झाली.
सदर जामीन अर्जाची सुनावणी वेळी फिर्यादीची साक्ष नोंदवण्यात आली. तसेच आरोपीचे वकिलांनी आरोपीचे वय 73 वर्ष असून त्याने कोणताही गुन्हा केलेला नाही केवळ तो फिर्यादीचे नवऱ्यावर झालेल्या केस मध्ये साक्षीदार असल्याने त्याचे विरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला असल्याबाबत तसेच आरोपी हा घटनेवेळी घटनास्थळावर हजर नसून तो झरे येथे हजर असल्याबाबतचा युक्तिवाद करण्यात आला सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीची 50 हजार रुपयांच्या जातमचलक्यावर जामिनावर मुक्तता करण्यात आली.
- रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरीच्या जाचक अटी शिथिल करा- भाजप जिल्हा सचिव लक्ष्मण केकान
- करमाळ्यात मराठा कुणबी प्रकरणासाठी अडवणूक ; ऐजंट आणि अधिकाऱ्यांमध्ये मिलीभगत- युवासेनेचा धरणे आंदोलनाचा इशारा
- भाळवणीच्या तृप्ती वाघमारे चे नीट (NEET) परीक्षेत घवघवीत यश
- कुंभेजच्या बागल विद्यालयात केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धांचे आयोजन
- २०१४ ला २५७ चा मटका नव्हता, जनतेचा कौल होता! हे २०२४ लाही जनतेने दाखवून दिले ; विरोधकांना पाटील गटाचा “हाबाडा”