लाच लुचपत कारवाई : मंडळ अधिकारी यांची जामीनवर मुक्तता
यात आरोपीतर्फे अॕड निखिल पाटील व अॕड दत्तप्रसाद मंजरतकर यांनी काम पाहिले.
करमाळा, दि. 10 (करमाळा-LIVE)-
लाच लुचपत कारवाई अंतर्गत उमरड येथील मंडळ अधिकारी शाहिदा काझी यांची जामीनवर मुक्तता झाली आहे.
यात हकीकत अशी की, मौजे झरे येथील तक्रारदाराने त्यांचे वडील सन 2020 मध्ये मयत झालेले होते व त्यांनी त्यांचे मृत्यूपत्र करून ठेवले होते तरी सुद्धा त्यांचे मृत्यूनंतर वारस नोंद घेण्यात आलेली होती सदरच्या नोंदीस तक्रारदाराने हरकत घेऊन मृत्युपत्रानुसार नोंद लावण्यात यावी अशी विनंती केलेली होती व सदरचे काम मंडळाधिकारी उमरड शाहिदा काझी यांच्याकडे प्रलंबित होते व सदर कामाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने देण्याकरिता त्यांनी तक्रारदाराला 25 हजार रुपये लाचेची मागणी केलेली होती व तडजोडी अंती रक्कम रुपये वीस हजार लाच म्हणून स्वीकारण्याचे कबूल केले होते त्याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभाग सोलापूर यांच्याकडे तक्रार दाखल केली होती व दिनांक 30/05/2023 रोजी सापळा कारवाई करण्यात आली व त्या कारवाईदरम्यान मंडळ अधिकारी उमरड शाहिदा काझी यांना अटक करण्यात आली होती.
तद नंतर त्यांनी जामीन मिळणे कामे अॕड निखिल पाटील यांच्यामार्फत अतिरिक्त सत्र न्यायालय बार्शी येथे धाव घेतली होती सदर जामीन अर्जाची सुनावणी बार्शी येथील अतिरिक्त न्यायाधीश माननीय श्री जे .सी.जगदाळे साहेब यांच्यासमोर झाली सदर जामीन अर्जाचे सुनावणी वेळी आरोपीचे वकील अॕड निखिल पाटील यांनी त्यांचे युक्तिवादात लाचेची रक्कम मागणी केल्याबाबत शंकास्पद परिस्थिती असून तसा कोणताही पुरावा दिसून येत नाही तसेच लाच हाताने स्वीकारलेली नसून ती जाणून बुजून आरोपीच्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवण्यात आलेली असल्याचा युक्तिवाद केला तसेच तपास कामी आरोपीची गरज राहिलेली नसून आरोपीस योग्य त्या जामीनावर मुक्त करण्यात यावे आरोपी ही सरकारी कर्मचारी असून तपासात सहकार्य करण्यास तयार आहे असा युक्तिवाद केला सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी शाहिदा काझी यांची 50000 रुपयांच्या जातमुचलुक्यावर जामिनावर मुक्तता करण्यात आली.