08/06/2025

बनावट नोटा तयार करून वितरित करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्या प्रकरणी दोघांना जामीन मंजूर

0
IMG-20230601-WA0006.jpg

सदर प्रकरणी आरोपीतर्फे अॕड निखिल पाटील आणि अॕड दत्तप्रसाद मंजरतकर यांनी काम पाहिले.

करमाळा, दि. 1 (करमाळा-LIVE)-
बनावट नोटा तयार करून वितरित करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्या प्रकरणी दोघांना जामीन मंजूर झाला आहे.

याबाबत हकीकत अशी की, दि. 3 डिसेंबर 2022 रोजी स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर यांना गोपनीय बातमीदाराकडून इसम नामे 1) हर्षल लोकरे (रा.कंदर, ता. करमाळा) हा त्याच्या ताब्यात मोठ्या प्रमाणात भांडवली नोटा बाळगून असून तो सदरच्या बनावट नोटा या बाजारात खऱ्या आहेत असे भासवून खपवण्यासाठी कुर्डूवाडी शहरातील टेंभुर्णी चौक येथे येणार आहे अशी माहिती मिळाली. त्यानंतर सापळा कारवाई करण्यात आली व हर्षल लोकरे यास बनावट नोटासह अटक करण्यात आली तदनंतर गुन्ह्याचा तपास सुरू झाला व तपासामध्ये 2) सुभाष दिगंबर काळे (रा. कुर्डूवाडी, ता. माढा) 3) प्रभाकर उर्फ गणेश सदाशिव शिंदे (रा.भोसरे, ता. माढा) 4) पप्पू भारत पवार रा.(अर्जुन नगर ता.करमाळा) 5) शिवाजी विठ्ठल घाडगे (रा.अकुंबे ता.माढा) 6) राम जगन्नाथ रूपनवर (रा. फडतरी ता. माळशिरस) 7) लक्ष्मण जगन्नाथ रुपनवर (रा. फडतरी ता. माळशिरस) 8) अमोल डांगे राहणार (रा.कंदर ता. करमाळा) 9) खेडकर (रा.पंढरपूर) 10) हनुमंत मोरे (रा.जेऊर ता. करमाळा) यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते सदर प्रकरणी आरोपी नंबर दोन ते तीन यांनी पाचशे रुपये दराच्या बनावट नोटा फसवणूक करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या ताबे कब्जात बाळगून नोटा बनवत असल्याची माहित असून देखील चलनामध्ये वितरित केल्या तसेच आरोपी क्रमांक दोन ते चार यांनी सदर नोटा बनवण्याकरता लागणारे साहित्य गोळा करून त्या साहित्याच्या मदतीने पाचशे रुपये दराच्या बनवून नोटा तयार केल्या.

आरोपी नंबर दोन ते चार यांनी अशा बनावट नोटा तयार केलेल्या चलनामध्ये वितरित करण्यासाठी आरोपी क्रमांक एक व पाच ते दहा यांना मोबदला घेऊन पुरविल्या आहेत असा दोषारोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता यातील आरोपी नंबर सहा व सात राम जगन्नाथ रूपनवर व लक्ष्मण जगन्नाथ रुपनवर यांनी अॕड निखिल पाटील यांचे मार्फत अतिरिक्त सत्र न्यायालय बार्शी येथे जामीन मिळणे कामी धाव घेतली होती सदर जामिन अर्जाची सुनावणी बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश माननीय श्री जे.सी .जगदाळे यांच्यासमोर झाली सदर जामीन अर्जाच्या सुनावणी वेळी यातील आरोपी नंबर 6 व 7 राम व लक्ष्मण यांचा बनावट नोटा तयार करणे किंवा वितरित करण्यामध्ये कोणताही सहभाग नसून त्यांचे विरुद्ध भादवी कलम 489 अ तसेच त्यांचा पुरावा नष्ट करण्यामध्ये कोणताही सहभाग नसल्याने भादवि कलम 201 लागू होत नसल्याचा युक्तिवाद केला तसेच माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडील न्यायनिवाडे सादर केले तसेच सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असून सदर गुन्ह्यामध्ये आरोपी विरुद्ध कोणताही सबळ पुरावा नसून खटला चालण्यास बराच कालावधी लागणार आहे अशा परिस्थितीत आरोपींना जामीनावर मुक्त करण्यात यावे असा युक्तिवाद केला सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी राम जगन्नाथ रूपनवर व लक्ष्मण जगन्नाथ रूपनवर यांची 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीनावर मुक्तता करण्यात आली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page