करमाळा, दि. २८ (करमाळा-LIVE)-
गांजा बाळगल्या प्रकरणी जेऊर येथील एकास जामीन मंजूर झाला आहे.
दि. २९ मे रोजी करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की जेऊर येथे एक इसम गांजा विक्रीकरिता घेऊन येणार आहे अशी विश्वसनीय माहिती प्राप्त झाल्याने माननीय पोलीस निरीक्षक रणजीत माने व इतर पोलीस स्टाफ यांनी जेऊर येथे मध्यरात्री सापळा कारवाई केली होती सदर कारवाईदरम्यान महादेव बाबुराव फाळके (वय ६८) त्यांच्याकडील पांढऱ्या पिशवीमध्ये सहा किलो आठ ग्रॅम गांजा सह मिळून आले होते.
तदनंतर पोलिसांनी कारवाई करून सदरचा गांजा जप्त करून महादेव बाबुराव फाळके यांना ३० मे रोजी अटक करण्यात आली होती.
तदनंतर त्यांनी जामीन मिळणे कामी अॕड निखिल पाटील यांचे मार्फत बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात धाव घेतली होती सदर जामीन अर्जाची सुनावणी बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश माननीय मलकापट्टे रेड्डी मॅडम यांचे समोर झाली आरोपीचे वकील अॕड निखिल पाटील यांनी त्यांचे युक्तिवादामध्ये सदरची सापळा कारवाई व झडती ही राजपत्रित अधिकाऱ्याने करणे आवश्यक असून सदर कारवाई वेळी राजपत्रित अधिकारी हजर नव्हता तसेच सदर केसचा तपास पूर्ण होता आला असून आरोपीचे वय लक्षात घेता त्यास जामिनावर मुक्त करण्याबाबत विनंती केली सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी महादेव बाबुराव फाळके याची अटी व शर्ती तसेच पन्नास हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली.
सदर प्रकरणी आरोपीतर्फे अॕड निखिल पाटील, अॕड दत्तप्रसाद मंजरतकर, अॕड सतपाल नरखेडे, अॕड श्रीराम अंधारे यांनी काम पाहिले.