08/06/2025

अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन अत्याचार केल्या प्रकरणी दहिगावं येथील एकास जामीन मंजूर

0
IMG-20221210-WA0012-2-2-1-1.jpg

सदर प्रकरणी आरोपीतर्फे अॕड निखिल पाटील,अॕड दत्तप्रसाद मंजरतकर, अॕड सतपाल नरखेडे यांनी काम पाहिले.

करमाळा, दि. १० (करमाळा-LIVE)-

अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन अत्याचार केला प्रकरणी दहिगाव येथील एकास जामीन मंजूर झाला आहे.


या बाबत हकीकत अशी की, करमाळा तालुक्यातील दहिगावं येथील अजित बाबुराव मुरूमकर (वय 22) याच्याविरुद्ध करमाळा पोलीस स्टेशन येथे भादवि कलम 363 376(2)(n) 376(3)यासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4 व 6प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता.

सदर गुन्ह्यामध्ये त्यास दिनांक 05/02/2024 रोजी अटक करण्यात आली होती. तदनंतर त्याने जामीन मिळणे कामी अॕड निखिल पाटील यांचे मार्फत बार्शी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय येथे धाव घेतली होती. सदर जामीन अर्जाची सुनावणी बार्शी येथील अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायाधीश माननीय श्री जे.सी.जगदाळे साहेब यांचे समोर झाली.

सदर जामीन अर्जाचे युक्तीवादावेळी आरोपीचे वकील अॕड निखिल पाटील यांनी त्यांचे युक्तिवादात दोन्हीही युवक युवती एकमेकांचे जवळचे नातेवाईक होते दोघांनी स्वविचाराने पळून जाण्याचे ठरवलं होतं व तदनंतर ते स्वतःहून पोलीस स्टेशन येथे हजर झाले होते सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला असून पोलिसांनी आरोपी विरुद्ध आरोप पत्र दाखल केलेले आहे. त्यामुळे आरोपीस तुरुंगात ठेवून कोणताही फायदा होणार नसून त्यास जामीनावर मुक्त करण्यात यावे असा युक्तिवाद करण्यात आला.

सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी अजित बाबुराव मुरूमकर याची अटी व शर्तीवर जामिनावर मुक्तता करण्यात आली.

सदर प्रकरणी आरोपीतर्फे अॕड निखिल पाटील,अॕड दत्तप्रसाद मंजरतकर, अॕड सतपाल नरखेडे यांनी काम पाहिले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page