18/12/2024

दहिगावं उपसा सिंचन योजना :  बंदनलिका वितरण प्रणाली द्वारे सुरू असलेल्या कामाची आमदार संजयमामा शिंदे यांनी केली पहाणी

0
IMG-20240518-WA0014.jpg

करमाळा, दि. १८ (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायीनी असलेल्या दहिगावं उपसा सिंचन योजनेच्या बंदनलिका वितरण प्रणाली कामाचा शुभारंभ डिसेंबर २०२३ मध्ये आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते झालेला होता.

या कामाची प्रगती कितपत झालेली आहे याची प्रत्यक्ष पाहणी आमदार संजयमामा शिंदे यांनी आज दिनांक १७ मे २०२४ रोजी केली.

यावेळी त्यांच्यासोबत दहिगावं उपसा सिंचन योजना अर्थातच कुकडी डावा कालवा उपविभाग क्रमांक १२ चे उपाभियंता एस.के. अवताडे, कनिष्ठ अभियंता सोहम कांबळे, आमदार संजयमामा शिंदे गटाचे सुजिता तात्या बागल, केशव दास, सौंदे चे उपसरपंच उमेश वीर, कन्स्ट्रक्शन चे श्री राजमाने, श्री लोंढे आदी उपस्थित होते.

करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन योजना ही अतिशय महत्वाची योजना आहे. या योजनेची उर्वरित कामे पूर्ण झाल्यानंतर २४ गावातील १०५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. शेतकरी सर्वांगीण दृष्ट्या विकसित होणार असून ही योजना पूर्ण करण्यासाठी आमदार शिंदे यांचे प्रयत्न सुरु आहेत. शेतकऱ्यांनी ही योजना पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याची गरज असून शेतीचे नुकसान होणार असल्यास त्याचे पंचनामे करून भरपाई दिली जाणार आहे, असे आमदार शिंदे यांनी सांगितले आहे.

दहिगाव योजनेची तांत्रिक बाजू –
१) वार्षिक एकूण पाणी वापर :- १.८१ टीएमसी
२) एकूण लाभक्षेत्र : अ) पिक क्षेत्र १३३३५ हेक्टर
ब) लाभक्षेत्र – १०५०० हेक्टर
३) लाभक्षेत्रातील एकूण गावे: २४ (ता. करमाळा, जि. सोलापूर) मूळ प्रशासकीय मान्यता :- या योजनेच्या रु. ५७.६६ कोटी खर्चास महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांनी निर्णय क्र. २९६/१४८ (१९९६) प्रशा-३/दिनांक १०/१०/१९९६ अन्वये प्रशासकीय मान्यता दिलेली आहे.
सुधारीत प्रशासकीय मान्यता :- योजनेच्या संकल्पनामध्ये झालेले बदल व दरांमध्ये झालेली वाढ याचा विचार होऊन (१३९/०८) मोप्र. १ मंत्रालय, मुंबई दि. २७/०२/२००९ अन्वये प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता दिलेली आहे.

द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता: सदर प्रकल्पास शासन निर्णय क्र. सुप्रमा-०९२०/प्र.क्र. (२८६/२०२०) /मोप्र-१ दि. २०/१०/२०२१ अन्वये रु. ३४२.३० कोटी किमतीस द्वितीय सुधारित मान्यता प्राप्त आहे.

बंदनलिका वितरण प्रणालीचे काम प्रगतीपथावर- दहिगांव उपसा सिंचन योजनेच्या २७ लघुवितरिका पैकी डावी लघुवितरिका क्र.३, उजवी लघुवितरिका ३ व उजवी लघुवितरिका क्र. ८ चे बंद नलिका वितरण प्रणालीचे काम चालू असून जून २०२४ पर्यंत या ३ लघुवितरिका पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. (एस. के .अवताडे. उपअभियंता कुकडी डावा कालवा उपविभाग क्रमांक १२)

याद्वारे योजनेवरील सौंदे, साडे, हिसरे, फिसरे, सालसे, शेलगावं (क), अर्जुननगर, पांडे, सरपडोह, कुंभेज, कोंढेज, जेऊर, वरकटणे, लव्हे आदी गावांतील क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page