ढोकरी: शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी

जेऊर, दि. 7 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील ढोकरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्ष पदी ढोकरी गावचे माजी सरपंच हिरा चौगुले यांची निवड करण्यात आली.
या निवडीनंतर त्यांचा सत्कार वांगी विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन भैरवनाथ बंडगर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ढोकरी गावचे सरपंच देवा पाटील, मुख्याध्यापक. मेनकुदळे सर, देशमुख सर, जगन्नाथ सांगवे, विलास वळसे, मामा मांढरे, उमेश गोफणे, सचिन जाधव आदि उपस्थित होते.

