डबल उपमहाराष्ट्र केसरी अतुल पाटील यांना ‘मल्हाररत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल जेऊर ग्रामपंचायतच्या वतीने सन्मान


जेऊर, दि. 20 (करमाळा-LIVE)-
करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती, डबल उपमहाराष्ट्र केसरी अतुल पाटील यांना ‘मल्हाररत्न पुरस्कार’ मिळाल्याबद्दल जेऊर ग्रामपंचायतच्या वतीने सन्मान करण्यात आला.
होळकरशाहीचे संस्थापक श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या 33 व्या जयंती निमित्त पुण्यश्लोक फाऊंडेशनच्या वतीने रविवारी पंडित नेहरू सांस्कृतिक सभागृह पुणे येथे ‘मल्हाररत्न पुरस्कार’ प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी डबल उपमहाराष्ट्र केसरी तथा करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती अतुल पाटील यांना ‘मल्हाररत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर, ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस पुणे आयकर आयुक्त नितीन वाघमोडे,कार्यक्रमाचे संयोजक धनंजय तानले यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
याबद्दल ग्रामपंचायत जेऊरच्या वतीने सभापती अतुल पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी आमदार नारायण पाटील स्वतःहा उपस्थितीत होते. त्यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
यावेळी भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अनिल कुमार गादिया, लोकनियुक्त सरपंच पृथ्वीराज पाटील, उपसरपंच नागेश झांजुर्णे, प्रवक्ते सुनील तळेकर, माजी उपसरपंच धनंजय शिरस्कर, माजी सदस्य विनोद गरड, ग्रामपंचायत सदस्य उमेश कांडेकर, माजी सरपंच भारत साळवे, हंबीरराव चव्हाण, सदस्य राकेश गरड, सदस्य बापूसाहेब घाडगे, राजू गरड, धनंजय घोरपडे, मुबारक शेख, सोसायटी व्हाईस चेअरमन महेश कांडेकर, बहुजन संघर्ष सेनेचे गरड, शांताराम सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.


